मृत्यूचे कारण गुलदस्त्यात
लोकार्थ प्रतिनिधी कार्तिक राजगुरू
कन्नड – तालुक्यातील आठेगाव खेडा बांध परिसरात असलेल्या सरकारी विहिरीत ३९ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.मृतकाची ओळख दादा विठ्ठल जाधव (वय ३९, रा. हिलालपूर, ता. वैजापूर) अशी झाली आहे. रविवारी सायंकाळी ७:३० वाजेच्या सुमारास ही घटना समोर आली.
आठेगाव खेडा बांध परिसरात ऊसतोडणीचे काम सुरू आहे. रविवारी सायंकाळी काही मजूर पाणी घेण्यासाठी परिसरात असलेल्या सरकारी विहिरीजवळ गेले होते. याचवेळी त्यांना विहिरीत एका व्यक्तीचा मृतदेह पडलेला दिसला. अचानक मृतदेह दिसल्याने मजूर घाबरले. त्यांनी तात्काळ स्थानिक नागरिकांना याची माहिती दिली.
नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक एन.व्ही.गीते पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून आवश्यक माहिती गोळा केली.
अपघात की अन्य कारण तपास सुरू.
दादा विठ्ठल जाधव हे कोणत्या परिस्थितीत मृत झाले, ते सरकारी विहिरीपर्यंत कसे पोहोचले आणि त्यांच्या मृत्यूचे खरे कारण काय, या प्रश्नांची उत्तरे अद्याप समोर आलेली नाहीत. हा अपघात आहे की यामागे दुसरे काही कारण आहे, याचा पोलीस तपास करत आहेत. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि पोलिस चौकशीनंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.
घटनेची माहिती मिळताच आठेगाव खेडा बांध परिसरात नागरिकांची गर्दी झाली होती. पोलिस तपासानंतर या प्रकरणातील खरी परिस्थिती स्पष्ट होणार आहे.
त्यानंतर वैद्यकीय अधिकारी शोएब मोहम्मद यांनी मृतदेहाची तपासणी करून दादा विठ्ठल जाधव यांना मृत घोषित केले.
No Comment! Be the first one.