ढोरकीन येथे चार जिल्हा परिषद गटांसह पैठण शहरातील गरजू व विधवा महिलांना शिधावाटप
लोकार्थ प्रतिनिधी चंद्रकांत अंबिलवादे
सामाजिक बांधिलकी जपत समाजातील गरजू, कष्टकरी आणि वंचित घटकांच्या कुटुंबातही दिवाळीचा आनंद फुलावा, या उदात्त हेतूने आमदार विलास बापू भुमरे यांच्या पुढाकारातून दिवाळीनिमित्त शिधावाटप उपक्रम राबविण्यात आला.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पैठण तालुक्यातील ढोरकीन येथे या शिधावाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार विलास बापू भुमरे यांच्या हस्ते ढोरकीन, बिडकीन, चितेगाव व पिंपळवाडी या चार जिल्हा परिषद गटांसह पैठण शहरातील गरजू लाभार्थी आणि विधवा महिलांना शिध्याचे वाटप करण्यात आले.
दिवाळी हा आनंदाचा आणि मांगल्याचा सण आहे. समाजातील प्रत्येक घटकाला हा सण आनंदाने साजरा करता यावा, गरजू व कष्टकरी कुटुंबांच्या घरातही दिवाळीचा गोडवा निर्माण व्हावा, या सामाजिक जाणिवेतून हा उपक्रम राबविण्यात आला. समाजातील प्रत्येक घटकाच्या सुख-दुःखात सहभागी होऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणे हाच या उपक्रमामागील प्रामाणिक उद्देश असल्याचे आमदार विलास बापू भुमरे यांनी यावेळी सांगितले.
या उपक्रमामुळे अनेक गरजू कुटुंबांना दिवाळीच्या सणात मोठा आधार मिळाला असून, सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.
याप्रसंगी रमेश पवार, आप्पासाहेब निर्मळ, दादा पाटील बारे, अण्णासाहेब लबडे, विनोद बोंबले, वैशाली बोंबले, जगताप, संजय लघाने, संतोष बोंठे यांच्यासह स्थानिक शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No Comment! Be the first one.