६ आणि १० नोव्हेंबरला बाह्यरुग्ण विभाग बंद; आपत्कालीन सेवा मात्र २४ तास सुरू राहणार
लोकार्थ प्रतिनिधी शरद मेहकर
लातूर : दिवाळी सणानिमित्त विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागाच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी घोषित केलेल्या स्थानिक सुट्टीमुळे शुक्रवार, ६ नोव्हेंबर रोजी तसेच दीपावली पाडव्याच्या शासकीय सुट्टीमुळे १० नोव्हेंबर रोजी ओपीडी सेवा बंद राहणार आहे.
रविवार, ८ नोव्हेंबर रोजी नेहमीप्रमाणे साप्ताहिक सुट्टी असेल. शनिवार, ७ नोव्हेंबर आणि सोमवार, ९ नोव्हेंबर रोजी ओपीडी नियमित वेळेत सुरू राहणार आहे. बुधवार, ११ नोव्हेंबरपासून सर्व ओपीडी सेवा पूर्ववत होतील.
मात्र रुग्णालयाची आपत्कालीन सेवा २४ तास सुरू राहणार असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन गरड यांनी दिली आहे.
No Comment! Be the first one.