पोळ रांजणगावजवळ अपघात; विशाल सपकाळ यांचा मृत्यू
विजय देऊळगावकर
गंगापूर तालुक्यातील पोळ रांजणगावजवळ रविवारी (१३ सप्टेंबर) रात्री दहाच्या सुमारास अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने तरुणाचा मृत्यू झाला. विशाल प्रभाकर सपकाळ (२५, रा. लासूरगाव, ता. वैजापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे.
विशाल हे दुचाकीने (एमएच ५७ डी ६३८२) वाळूज एमआयडीसीकडे जात असताना पोळ रांजणगाव येथे अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. गंभीर जखमी अवस्थेत नागरिकांनी त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सोमवारी (१४ सप्टेंबर) लासूरगाव येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण, पत्नी व एक मुलगी असा परिवार आहे. अपघाताची नोंद शिल्लेगाव पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, धडक देणाऱ्या वाहनाचा शोध सुरू आहे.

मयत विशाल सपकाळ
No Comment! Be the first one.