३ कोटी १२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त: जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, पोलिस अधिक्षक डॉ निलाभ रोहन वाळू घाटावर
लोकार्थ प्रतिनिधी बालाजी वैजळ
नांदेड : जिल्ह्यातील एकाच दिवशी अनेक पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध वाळू उपसा प्रकरणात पोलिसांनी जोरदार कारवाई करत वाळू माफियांचे कंबरडे मोडले असून पोलिसांनी १३ कोटी १२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी या प्रकरणात २७ मोठ्या बोटी, १३ लहान बोटी, ५ इंजिन, १०८ तराफे जप्त केले आहेत. विविध पोलिस ठाण्यात अवैध वाळू उपसा करणार्या विरोधात धडक कारवाई केली आहे.
नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील इळेगाव येथे बिलोली येथील उपविभागीय पोलिस अधिकारी श्याम पानेगावकर यांच्यावर वाळू माफियांनी हल्ला केला होता. तेव्हा पोलिस अधिक्षक डॉ निलाभ रोहन यांनी अवैध वाळू उपसा करणार्या विरोधात जोरदार कारवाई सुरू केली होती. पोलिस अधिक्षक डॉ निलाभ रोहन यांनी सर्व पोलिस अधिकारी यांची बैठक घेऊन ११ आकटोबर रोजी एकाच वेळेस नांदेड जिल्ह्यात कारवाई करण्याचा निर्णय घेतला. ११ आकटोबर रोजी सकाळी नांदेड जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा करणारे यांच्या विरोधात धडक मोहीम राबवित उस्माननगर, मुदखेड, लिंबगाग, ग्रामीण पोलिस, धर्माबाद, नायगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गोदावरी नदीच्या पात्रात अवैध वाळू उपसा करणार्या विरोधात कारवाई केली. पोलिसांनी सदर घटनेत नांदेड जिल्हा पोलिसांची वाळू माफियांविरुद्ध ‘विशेष मोहिम राबविण्यात आली.जिल्ह्यात एकाच दिवशी धडक कारवाई करुन गोदावरी पात्रातील 27 मोठ्या बोटी, 13 लहान बोटी, 05 इंजीन, 108 तराफे, 4 हायवा, 1 टेम्पो, 1 ट्रॅक्टर, 1 पोकलेन व 555 ब्रास रेती असा मुद्देमाल जप्त केला असून त्यांची अंदाजे 13 कोटी 12 लाख 01 हजार रुपये आहे. पोलिसांनी सदर मुद्देमाल जिलेटीन स्फोट करुन मुद्देमाल नष्ट केला.
नांदेड जिल्ह्यातील गोदावरी नदीपात्रातून चालणारा बेकायदेशीर वाळू उपसा, पर्यावरणाचा हास आणि शासनाचा महसूल बुडवून होणारी चोरटी वाहतूक मुळासकट मोडून काढण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलिस अधिक्षक डॉ. नीलाभ रोहन, अप्पर पोलिस अधिक्षक सुरज गुरव, यांच्या आदेशान्वये संपूर्ण जिल्ह्यात व्यापक ‘कोंबिंग ऑपरेशन’ व धडक मोहीम राबविण्यात आली आहे.
या मोहिमेत अपर पोलीस अधीक्षक, 6 पोलीस उप अधीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा सह मुदखेड, उस्माननगर, नांदेड ग्रामीण, नायगाव, लिंबगाव आणि धर्माबाद या सर्व पोलीस ठाण्यांच्या पथकातील 30 पोलीस अधिकारी, 121 पोलीस अंमलदार, 70 होमगार्ड, 02 आर.सी.पी. प्लाटुन यांनी नदीपात्रातील वाळू उपसा केंद्रे तसेच रस्त्यांवरील वाहतुकीवर एकाच वेळी छापे टाकले. या मोहिमेत जिल्ह्यातील विविध ठिकाणांवरून एकूण 13 कोटी 12 लाख 01 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त व नष्ट करण्यात आला असून वाळू माफिया, चालक व वाहन मालकांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) व महाराष्ट्र जमीन महसूल संहितेनुसार कठोर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
No Comment! Be the first one.