माजी आमदार मा.श्री सतीशजी चव्हाण साहेब यांनी खालील प्रश्नांची उत्तरे जालन्यात येऊन पदवीधरांना द्यावीत !
लोकार्थ प्रतिनिधी राहुल मुळे जालना
१) पीएच डी साठी सुरू असलेला भ्रष्टाचार विरुद्ध ह्यांनी काय उपाय योजना केल्या?
२) विद्यापीठ उपकेंद्र सध्या कुठल्या स्थितीत आहेत?
३) सगे सोयरे सोडून ह्यांनी कुठं निधी वाटप केला?
४) मागील १८ वर्षाच्या कालावधीमध्ये वरिष्ठ महाविद्यालयातील जागा भरण्यासाठी आपण काय प्रयत्न केले पंधरा वर्षापासून भरती बंद आहे.?
५)वरिष्ठ महाविद्यालयातील सामाजिकशास्त्र विषयाच्या दुसऱ्या पोस्ट अद्यापही मंजूर नाहीत त्यांचे काय झाले.?
६)संस्थेमध्येही भरती करताना पवित्र पोर्टल अमलात आणले परंतु एका जागेसाठी दहा उमेदवार पाठवणे यामागील गोड बंगाल काय?
७)तासिका तत्त्वावरील प्राध्यापक नेट. सेट. एम फील.एच.डी आणि आपल्या म्हणण्याप्रमाणे पूर्ण पात्रता धारण करूनही आज ते तासिका तत्त्वावरच वयोवृद्ध होत आहेत.?
८)मागील अठरा वर्षाच्या कालखंडामध्ये पदवीधरांसाठी आपण काय प्रयत्न केले?
९)नीट पेपर फुटी सीईटी घोटाळे एमपीएससी पेपर फुट वैद्यकीय क्षेत्रातल्या विविध पेपर फुटी अशा महत्त्वाच्या प्रश्नावर आपण कधी आवाज उठवलाय का? आणि उठवला असेल तर त्याचे संदर्भ द्यावेत.
१०)महाराष्ट्रातील ७८ महाविद्यालय २००० ची परवानगी आहे परंतु २००१ मध्ये सुरू झाले अनुदानित विनाअनुदानित या शब्दाच्या घोळामध्ये ही महाविद्यालये अडकलेले आहेत आतापर्यंत त्यांना ग्रँड मिळालेला नाही त्यांची काहीही चूक नसताना या तांत्रिक अडचणीमध्ये ही महाविद्यालये आपल्या नाकर्तेपणामुळे अडचणीत सापडली आहेत त्या प्राध्यापकांच्या प्रश्नांची उत्तरे कोण देणार?
११)डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत कान्हेरे समिती नियुक्त प्राध्यापकांचा प्रश्न किती दिवसापासून प्रलंबित आहे हे आपल्याला ज्ञात असूनही जाणीवपूर्वक या प्रश्नाकडे डोळेझाक का केली जाते यामागे आपला स्वार्थ काय? शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे कान्हेरी समितीचा संदर्भ घेऊन तेथील प्राध्यापकांना सहावा आणि सातवा आयोग मिळतो परंतु मूळ ज्यांचा आधार घेऊन कोल्हापूर विद्यापीठामध्ये कामे झाली आणि अद्यापही आपल्या मराठवाडा विद्यापीठांमध्ये कान्हेरे कमिटीतील प्राध्यापक पाचव्या वेतन आयोगाप्रमाणे म्हणजेच शिपायापेक्षाही कमी पगार उचलत आहेत याचे दुःख आपल्याला होत नाही का असा सवाल आहे.
ह्या बाबत मा.महोदय साहेबांनी जालन्यात येउन पदवीधरांना उत्तर देणे गरजेचे असून ते त्यांनी करावे ही अपेक्षा .
No Comment! Be the first one.