लोकार्थ प्रतिनिधी
मध्य प्रदेशातील चंबलच्या एका डाकूचा नातू आयआयटी होतो, परदेशात उच्चपदावर नोकरी करतो आणि भारतात परतून बुद्धिमत्तेच्या बळावर रेल्वे विभागातही उच्च पद पटकावतो. ही कपोलकल्पित कहाणी नाही, सत्य घटना आहे. देव प्रभाकरसिंग तोमर असं या अधिकाऱ्याचं नाव असून, त्यानं आयआयटी रूपरमधून शिक्षण पूर्ण करून नीदरलँडस् मध्ये नोकरी मिळतीवली. काही काळानं यूपीएससीची परीक्षा देण्यासाठी तो भारतात परतला, लेखी अन् तोंडी परीक्षांमध्ये तो उत्तीर्णही झाला. त्यानं आयआरएसची (इंडियन रेल सर्व्हिसेस) निवड केली. सध्या तो भारतीय रेल्वे मंत्रालयात उच्च पदावर काम करतोय.

No Comment! Be the first one.