लोकार्थ प्रतिनिधी जयपाल ठाकूर औसा
सेवा संकल्प अभियानांतर्गत औसा विधानसभा मतदारसंघाची ‘विकसित भारत संकल्प सभा व सेवा ज्योती यात्रा’ किल्लारी येथील शिवपार्वती मंगल कार्यालयात पार पडली. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र ग्रामविकास व पंचायत राज प्रकोष्ठाच्या संयोजकपदी निवड झाल्याबद्दल लातूर जिल्हा परिषद गटनेते रामचंद्र तिरुके यांचा मतदारसंघाच्या वतीने सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.
केंद्र सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांची उद्दिष्टे, पात्र लाभार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधा तसेच योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रक्रियेबाबत उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. शासनाच्या विविध योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी नागरिकांमध्ये जनजागृती करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
शासकीय योजना केवळ कागदावर न राहता पात्र लाभार्थ्यांना त्यांचा प्रत्यक्ष लाभ मिळणे आवश्यक असून, त्यातून विकसित भारताच्या संकल्पनेला गती मिळेल, असे यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमास सुभाषराव जाधव, संतोष मुक्ता, काकासाहेब मोरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती चंद्रशेखर सोनवणे, क्रिएटिव्ह फाऊंडेशनचे अध्यक्ष ॲड. परिक्षीत पवार, शोभा पवार, लातूर जिल्हा परिषद पशुसंवर्धन सभापती कविता गोरे, औसा पंचायत समिती सभापती गंगाबाई कोदळीकर, उपसभापती अमोल पाटील, निलंगा पंचायत समिती उपसभापती बालाजी माने, माजी तालुकाध्यक्ष सूर्यकांत शिंदे, मंडळाध्यक्ष परमेश्वर धुमाळ, रवी चिलमे, शिवरुद्र मुरगे, सुनील उटगे, रमेश वळके, युवराज बिराजदार, सदाशिव जोगदंड, बंकट पाटील, श्रीराम माने, संजय उजळंबे, सिद्धू बालकुंदे, गौरीशंकर बालकुंदे, श्रीराम कुलकर्णी यांच्यासह मतदारसंघातील पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
सूत्रसंचालन गोविंद जाधव यांनी केले.
No Comment! Be the first one.