लोकार्थ प्रतिनिधी विजय देऊळगावकर छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगर : बीड बायपासवरील कमलनयन बजाज हॉस्पिटलवर अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) पथकाने छापा टाकून तपासणी केली. या कारवाईत ब्लड स्टोरेजमध्ये आढळलेल्या अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर त्याचा परवाना रद्द करण्यात आल्याची माहिती आहे. FDAचे सहआयुक्त विराज पाउनकर यांनी या कारवाईला दुजोरा दिला.
हॉस्पिटलमधील मेडिकल स्टोअरचीही FDAच्या पथकाने झाडाझडती घेतली. रुग्णांना हॉस्पिटलमधील मेडिकलमधूनच औषधे खरेदी करणे बंधनकारक केले जात असल्याच्या तक्रारींचीही तपासणी करण्यात आली. तसेच ब्लड स्टोरेजमध्ये रक्ताच्या किमतीत तफावत आढळल्याची माहिती समोर आली आहे.
FDAच्या या कारवाईमुळे हॉस्पिटल प्रशासनात खळबळ उडाली असून, पुढील तपासानंतर आणखी कारवाई होण्याची शक्यता आहे.

No Comment! Be the first one.