महात्मा फुले पुतळ्याजवळ जोरदार निदर्शने करत काळा दिवस पाळला
लोकार्थ प्रतिनिधी बालाजी वैजाळे नांदेड
नांदेड (म नेता)
लोकसभा विरोधी पक्ष नेते खा. राहुल गांधी, खा. प्रियांका गांधी यांनी दिल्ली येथे शांततेत आंदोलन करत असताना केंद्र शासनाने त्यांच्या सोबत केलेल्या अमानूष दुर्व्यवहाराच्या निषेधार्थ खा. रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाने आणि उत्तर जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे व महानगराध्यक्ष अब्दुल गफ्फार यांच्या उपस्थितीत जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने गुरुवारी रोजी शहरातील महात्मा फुले स्मारक आयटीआय चौक येथे निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात लोकसभा विरोधी पक्षनेते खा. राहूल गांधी व खा. प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वात दिल्ली येथे शांततेत आंदोलन सुरु होते मात्र आंदोलन उधळून लावण्यासाठी पोलीसांना पुढे करून केंद्र सरकारने अमानूष दुर्व्यवहार केला आहे. विरोध पक्षनेत्याला ही वागणूक देणे हा लोकशाहीचा अवमान असून या हुकुमशाहीचा निषेध करत आम्ही काळा दिवस पाळत जिल्ह्यातील अनेक तालुका पातळीवर देखील काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही निषेध आंदोलन करत आहोत अशी प्रतिक्रिया जिल्हाध्यक्ष डॉ. विठ्ठल पावडे व महानगराध्यक्ष अब्दुल गफ्फार यांनी दिली. यावेळी प्रा. यशपाल भिंगे, डॉ श्रावण रँपनवाड, सुरेंद्र घोडजकर, डॉ. रेखाताई चव्हाण, आनंद चव्हाण, श्रीनिवास मोरे, सत्यपाल सावंत, शोहब हुसेन, पाशा भाई, कुमार कुर्तडिकर, गणेश ठगे, महेश देशमुख तरोडेकर, निरंजन पावडे, सुरेश हटकर, गगन यादव, दिपकसिंग हुजारिया, बापुसाहेब पाटील, रमेश चित्ते, अब्दुल रहिम, नागराज सुलगेकर, संजय वाघमारे, शेख मुख्तार, ललिता कुभांर, ज्योती कदम, सुरेखा वैद्य, जेसिका शिंदे, संजय कौठेकर, शेर अली, अजिज कुमार, सचिन टाले, रहीम पटेल, सय्यद रिहान, मुन्तजिब, श्यामराव मनाठकर, जसपालसिंघ तबोलेवाले, एड. शीतल जोंधळे, पांडागळे, डॉ. बाकी, गोविंद पाटील, गणेश कोकाटे, गौतम शिरसाट, गणेश पाटील, असलम शेख, प्रकाश दीपके, अझहर शेख, आदीसह इतर काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No Comment! Be the first one.