लोकार्थ प्रतिनिधी जयपाल ठाकूर
लातूर : औसा तालुक्यातील किल्लारी येथे ३० सप्टेंबर १९९३ रोजी झालेल्या भीषण भूकंपात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना जिल्हा प्रशासनाच्यावतीने भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. यावेळी पोलीस दलामार्फत हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना देण्यात आली.
जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कुमार मीना यांनी स्मृतीस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून भूकंपातील दिवंगत नागरिकांना श्रद्धांजली वाहिली.
यावेळी आमदार अभिमन्यू पवार,औसा-रेणापूरचे उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे, औसाचे पोलीस उपअधीक्षक कुमार चौधरी, तहसीलदार घनश्याम अडसूळ, किल्लारीचे अपर तहसीलदार रामेश्वर स्वामी, किल्लारीचे सहायक पोलीस निरीक्षक महावीर जाधव यांच्यासह अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.
किल्लारीच्या त्या काळ्या दिवसाच्या स्मृतींना उजाळा देत भूकंपातील दिवंगत नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

No Comment! Be the first one.