पाच जणांची सामुदायिक आरोग्य अधिकारीपदी निवड; गुणवंतांसह पालकांचा ग्रामस्थांतर्फे सन्मान
लोकार्थ प्रतिनिधी विजय सोनवणे भोकरदन
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर मिळवलेल्या यशाचा अभिमानास्पद सोहळा शिवनगरी जळगाव सपकाळ (ता. भोकरदन) येथे पार पडला. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत सामुदायिक आरोग्य अधिकारीपदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत गावातील तब्बल पाच जणांनी यश संपादन करत शासकीय सेवेत स्थान मिळवले आहे. यासोबतच गावातील कन्या डॉ. वर्षा संजय सावळे यांनी बीएएमएस ही वैद्यकीय पदवी संपादन केल्याने गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
No Comment! Be the first one.