लोकार्थ प्रतिनिधी विजय देऊळगावकर
संभाजीनगर – मराठवाड्यातील शेतकरी सध्या कठीण परिस्थितीतून जात आहेत. या संकटाच्या काळात समाजातील प्रत्येक घटकाने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना धीर द्यावा, असे आवाहन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे यांनी केले.
माणिकचंद पहाडे लॉ कॉलेजतर्फे तापडिया सभागृहात आयोजित ‘अलीकडील वैधानिक बदल आणि न्यायालयीन निकाल’ कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कायदा हा सामाजिक न्यायाचे प्रभावी साधन असून, भावी वकिलांनी संविधानाचे रक्षण, सत्याची बाजू आणि वंचितांना न्याय मिळवून देण्याचे कर्तव्य पार पाडावे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी मराठवाडा लीगल अँड जनरल एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा ॲड. डॉ. कल्पलता पाटील-भारस्वाडकर, प्राचार्या डॉ. अपर्णा कोत्तापल्ले, समन्वयक अभय जाधव, कार्यक्रम समन्वयक अमृता कौर जोहर, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. ‘आविष्कार’ स्पर्धेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल तेजल हिलगे व यश वरकड यांचा न्यायमूर्ती वराळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

No Comment! Be the first one.