पाकिस्तानचा भारत, अफगाणिस्तानवर आरोप
खैबरपख्तुनख्वा : किस्तानच्या खैबरपख्तुनख्वा प्रांतातील कोहाट जिल्ह्यात शुक्रवारी मशिदीजवळच्या पोलिस वसाहतीत शुक्रवारी नमाजच्या वेळी शक्तिशाली बॉम्बस्फोट झाला. यात किमान १५ जणांचा मृत्यू झाला असून, २५हून अधिक जखमी झाले आहेत.
स्फोटकांनी भरलेली कार घरावर धडकवून हा स्फोट घडवून आणण्यात आला. पाकिस्तानने या स्फोटामागे अफगाणिस्तान आणि भारताचा हात असल्याचा आरोप केला आहे तर, दोन्ही देशांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. जिल्हा मुख्यालयाच्या रुग्णालयात आतापर्यंत १५ मृतदेह आणण्यात आल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली. जखमींमध्ये काही पोलिसांचाही समावेश आहे. या प्रांतात यापूर्वी मशिदीत झालेल्या स्फोटात ३० जणांचा मृत्यू झाला होता.
No Comment! Be the first one.