विजय देऊळगावकर
अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) पथकाने रविवारी शहरात छापा टाकून गुजरातहून आलेली ३,६९१ किलो संशयास्पद मिठाई व खवा जप्त केला. या मालाची किंमत सुमारे ६ लाख रुपये आहे.
अधिकाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली. दोन ट्रकवर छापा टाकण्यात आला. नीलकंठ ट्रक्समधून २०९१ किलो आणि वीर ट्रक्समधून १६६२ किलो मिठाई जप्त करण्यात आली.
जप्त केलेल्या मिठाई व खव्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. उर्वरित साठा खराब होऊ नये म्हणून -१०°C तापमानात सुरक्षित ठेवण्यात आला आहे. प्रयोगशाळेच्या अहवालानंतर दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे FDA अधिकाऱ्यांनी सांगितले.

No Comment! Be the first one.