लोकार्थ प्रतिनिधी राहुल मुले जालना
खादिम जमीयत उल अरब फाउंडेशन कमिटी सध्या राज्यभरात सामाजिक कार्य करत आहे.त्याचप्रमाणे खादिम जमीयत ऊल अरब ची जिल्हास्तरीय बैठक जालन्यातील दुःखी नगर येथे संपन्न झाली आहे.या बैठकीला अरब बिरादरीचे समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.या बैठकीत प्रामुख्याने शिक्षण,आरोग्य या सहित अन्य मूलभूत सुविधांबाबत चर्चा करण्यात आली.समाजातील जे गरजू विद्यार्थी असेल जे आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहतात अशा विद्यार्थ्यांचा खर्च जमियत यापुढे करणार असा निर्णय या बैठकीत करण्यात आला.त्याचप्रमाणे आरोग्य क्षेत्रातही गरजू लोकांना वैद्यकीय सुविधा देण्यासाठी जमीयत पुरेपूर प्रयत्न करणार असल्यास ची माहिती यावेळी आलेल्या प्रमुख पाहुण्यांनी दिली आहे.विशेष म्हणजे विधवा महिलांसाठी पेन्शन सुरू करण्यासाठी ही प्रयत्न करण्यात असल्याचे मान्यवरांनी सांगितले आहे.त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात कमिटी नेमण्यात येईल असेही ठरले आहे.तर जालन्यातील नागरिकांसाठीही एक भव्य रुग्णालय तयार करण्यात येईल अशी घोषणाही करण्यात आली आहे.या बैठकीसाठी अध्यक्ष अब्दुल कादर अल अमोदी,उपाध्यक्ष अदनान बाश्माशूल,शकील बाफझल,मुकरम अल्कसेरी,मुबारक बिन हैदरा,इम्रान बाशवान,फैसल बिन नासिर अल्कसेरी,मोहम्मद बिन हिलाबी,मुबारक बिन अफिफ,अहमद बिन साहब,यासीर बारावास,नासिर बिन बाजहाव,अली बाजहाव यांच्या समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर लवकरच भव्य मेळावा घेण्यात येईल अशी प्रतिक्रिया नासेर चाऊस यांनी दिली आहे.या मेळाव्याला जालन्यातील सर्व समाज बांधव उपस्थित राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.कार्यक्रम संपल्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
byte-01
No Comment! Be the first one.