नाना पाटेकर यांच्या नंतर चित्रपट सृष्टीला पुन्हा धक्का .
लोकार्थ प्रतिनिधी
पुणे : मराठी मनोरंजन विश्वातील दिग्गज अभिनेत्री मधु कांबीकर यांचं वयाच्या ७३ व्या वर्षी निधन झालं. पुण्यात दीर्घ आजाराने मधु कांबीकर यांची प्राणज्योत मालवली. मधु कांबीकर यांची लावणी कलावंत म्हणूनही ओळख होती. त्यांच्या निधनामुळे मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांनी नाटक, सिनेमा माध्यमातून अमाप लोकप्रियता मिळवली.
नोव्हेंबर २०१६ मध्ये मुंंबईतील एका कार्यक्रमात लावणीचं सादरीकरण करताना त्या बेशुद्ध झाल्या. तेव्हापासून त्या अंथरुणावर खिळून होत्या. मधु कांबीकर यांनी कारकीर्दीच्या सुरुवातीला अनेक वगनाट्यांमधून काम केलं. दादू इंदूरीकरांच्या गाढवाचं लग्न नाटकात त्यांनी साकारलेली भूमिका प्रचंड गाजली. पुढे ‘भानगडीशिवाय पुढारी नाही’, विच्छा माझी पुरी करा या गाजलेल्या नाटकांमधून मधु कांबीकर यांनी रंगभूमी गाजवली. बिन कामाचा नवरा, सतीची पुण्याई, एक होता विदुषक, चल रे लक्ष्या मुंबईला, झपाटलेला, मुक्ता, कुंकू, राजा पंढरीचा, गोष्ट छोटी डोंगराएवढी अशा गाजलेल्या चित्रपटांमध्ये मधु कांबीकर यांनी काम करुन प्रेक्षकांचं मन जिंकलं.
No Comment! Be the first one.