सोयगाव देवी हे जागृत देवस्थान, दर्शनासाठी भाविकांची गर्दी;नऊ दिवस विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल
लोकार्थ प्रतिनिधी विजय सोनवणे भोकरदन
भोकरदन तालुक्यातील सोयगाव देवी श्री दुर्गामातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवास रविवारी (ता.11) घटस्थापना करून सुरुवात झाली असून दर्शनासाठी पहिल्या दिवसापासूनच भाविकांची गर्दी वाढल्याचे दिसून आले आहे. भोकरदन शहरापासुन ५ किमी अंतरावर असलेल्या दुर्गावाडी येथिल दुर्गामाता मंदिरात नवरात्र मध्ये भक्तांच्या गर्दीने परिसर अगदी फुलून जातो. यामुळे सोयगाव देवी व भोकरदन शहराचे आराध्य दैवत असलेले श्री. दुर्गादेवी मंदिर हे नेहमीच विलोभनीय दिसते. तुळजापुरची तुळजाभवानीचे रूप असल्याचे भक्त मंडळी कडून बोलले जात आहे. तसेच भक्तांच्या हाकेला हो देणारी आणि भक्तांसाठी धाऊन जाणारी त्यांच्या मनोकामना, ईच्छापूर्ती पुर्ण करणारे एक जागृत देवस्थान म्हणून पंचक्रोशित या देवस्थानाची ख्याती बनली आहे.
आई उदे, उदे म्हणतं भक्तांच्या देवीच्या दर्शनासाठी मोठय़ा रांगा लागतात. मंदिरात प्रवेश करताच मन अगदी प्रसन्न होऊन जातं. उल्लेखनीय बाब म्हणजे या दुर्गा देवीची माहिती स्कंद पुराणात सांगितलेली आहे.

No Comment! Be the first one.