लोकार्थ प्रतिनिधी विजय देऊळगावकर छत्रपतीसंभाजीनगर
श्री गणेश महासंघाच्या श्री गणरायाची मिरवणूक दुपारी निराला बाजार येथून निघत शिवाजी हायस्कुल, संस्थान गणपती, शहागंज, सिटी चौक, गुलमंडी, संभाजीपेठ या मार्गाने निघून जिल्हा परिषदेच्या विसर्जन विहिरीजवळ पोहोचली. मध्यरात्री ११:५० मिनिटाला महापौर समीर राजूरकर,पोलिस आयुक्त प्रविण पवार, मनपा आयुक्त अमोल येडगे, यांच्या उपस्थितीत श्री गणरायाची आरती करून श्री गणरायाचे विसर्जन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचे उत्सव समिती अध्यक्ष हरिभाऊ हिवाळे यांनी स्वागत केले. सायंकाळी श्री विसर्जन स्थळी श्री गणेश भक्ती गीतांचा बहारदार कार्यक्रम सादर करण्यात आला.
No Comment! Be the first one.