एकनाथ साखर कारखाना मैदानावर हेलिपॅडची पाहणी; ट्रायल पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी
लोकार्थ प्रतिनिधी चंद्रकांत आंबिलवादे
राधिका मर्चंट-अंबानी या पैठण एमआयडीसीतील एन्कोर हेल्थकेअर औषधी निर्मिती करणाऱ्या उद्योग समूहाच्या सीईओ विनेर मर्चंट आणि शैला मर्चंट यांच्या कन्या असून उद्योगपती मुकेश अंबानी यांचे छोटे सुपुत्र अनंत अंबानी यांची पत्नी व अंबानी कुटुंबाची लहान सूनबाई आहेत.
यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पैठण एमआयडीसी परिसरात हेलिकॉप्टर लँडिंगची रंगीत तालीम घेण्यात आली. ही रंगीत तालीम पाहण्यासाठी परिसरातील तरुणासह नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
गर्दीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सपोनि भरत मोरे, पोलीस जमादार करतारसिंग सिंगल व अग्निशामक दल जवानाचे पथक तैनात होते. या दरम्यान नागरिकांची गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांकडून आवश्यक खबरदारी घेण्यात आली.
हेलिकॉप्टर उतरविण्यासाठी एकनाथ साखर कारखान्याच्या मैदानावर हेलिपॅडची स्थिती, परिसरातील हवामान आणि इतर तांत्रिक बाबींची पाहणी करण्यात आली. दिवसभर या ट्रायलची प्रक्रिया सुरू असल्याचे पाहायला मिळाले.
“हेलिकॉप्टर पाहण्यासाठी नागरिकांनी केलेली गर्दी आणि पोलिसांचा बंदोबस्त यामुळे पैठण एमआयडीसी परिसरात काही काळ उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले होते.
येत्या दोन दिवसात राधिका मर्चंट-अंबानी ह्या
पैठण एमआयडीसी एन्कोर हेल्थकेअर औषधी निर्मिती करणाऱ्या कंपनीत यापूर्वी राधिका मर्चंट यांनी आपले वडील व बहिणी सोबत पैठण येथे दोन वेळेस येऊन आपल्या कंपनीचा आढावा घेतलेला आहे. येथील येऊन कंपनीचा विस्तार वाढविण्याच्या उद्देशाने हा दौरा असून, त्यांच्या या दौऱ्यात पैठण एमआयडीसीतील
एन्कोर हेल्थकेअर औषधी निर्मिती कंपनीच्या विस्तार संदर्भात नवीन काय घोषणा होणार याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागले आहे.
No Comment! Be the first one.