लोकार्थ मिडिया
काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या कायदेशीर विभागाने सर्वोच्च न्यायालयात निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका दाखल केली आहे. अॅड. एस. प्रसन्न यांनी इंडिया आघाडीच्या वतीने सोमवारी ही याचिका दाखल केली. या याचिकेवर उद्या सुनावणीची शक्यता आहे. दरम्यान, इंडिया आघाडीचा मोर्चा सर्वोच्च न्यायालयाच्या बाहेर थांबला आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वाड्रा यांच्यासह ‘इंडिया’ आघाडीच्या हजारो समर्थकांनी सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने मोर्चा काढला होता. सुरुवातीला भारताचे मुख्य न्यायमूर्ती (CJI) सूर्य कांत यांना निवेदन सादर करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र, मुख्य न्यायमूर्तींनी त्यांना भेटण्यास नकार दिला आणि न्यायालयात इतर पक्षकारांप्रमाणेच कायदेशीर मार्गाने येण्यास सांगितलं. त्यानंतर या नेत्यांनी रीतसर याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला. राहुल गांधी हे याचिका दाखल करण्याच्या अंतिम वेळेत म्हणजेच सायंकाळी साडेचार पूर्वी सर्वोच्च न्यायालयात पोहोचू शकले नाहीत, त्यामुळे त्यांचे वकील एस. प्रसन्ना यांनी ही याचिका दाखल केली.
No Comment! Be the first one.