लोकार्थ प्रतिनिधी विजय देऊळगावकर
छत्रपती संभाजीनगर – सिडको, जळगाव मार्गांवरील श्री रेणुकामाता मंदिर संस्थान वेबसाईटचे घटस्थापनेला लोकार्पण करण्यात आले. विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष श्री. सतीश वैद्य यांच्या हस्ते वेबसाईट लोकार्पण सोहळा झाला. यावेळी विश्वस्त कार्यकारिणी पदाधिकारी सुधीर देशपांडे, सारंग टाकळकर, सुनील खोचे, उत्तमराव खोजे, प्रल्हाद गवारे, आदीची उपस्थिती होती. सुमित सुरडकर यांनी वेबसाईट तयार केली असून त्यांचा यावेळी मंदिरातर्फे गौरव करण्यात आला. www.renukamatamandir.com वेबसाईट ची संकल्पना वैद्य यांची असून वेबसाईट मध्ये मंदिर इतिहास, दुर्मिळ छायाचित्रे, दैनंदिन आरती पूजन वेळा, मंदिरात करावयाच्या सर्व धार्मिक विधीची माहिती आणि प्रक्रिया समाविष्ट असून. लवकरच कार्यान्वित होणाऱ्या सामाजिक संकुलात उपलब्ध सेवा सुविधा यांचीही माहिती वेबसाईट मध्ये समाविष्ट आहे. आज दुसऱ्या माळेला भाविकांनी सदगुरु भजनी मंडळ आणि आनंदी भजनी मंडळाच्या संगीत सेवेचा लाभ घेतला. दुपारी आरती नंतर साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद वाटप करण्यात आले. भाविकांचा ओघ वाढत असून दर्शन रांगा व्यवस्थापनासाठी स्वयंसेवकांची संख्या वाढविण्यात आली. आजपासून मंदिर परिसरात विविध रुग्णालयामार्फत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून दर्शनासोबत भाविकांनी याचाही लाभ घ्यावा असे आवाहन विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
No Comment! Be the first one.