खासदार संदिपान भुमरे यांच्या हस्ते पाचव्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा
लोकार्थ प्रतिनिधी चंद्रकांत आंबेलवदे
पैठण : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ऊसाला योग्य भाव मिळणे गरजेचे आहे. रेणुकादेवी-शरद सहकारी साखर कारखान्याकडून चालू गळीत हंगामासाठी २९०० रुपये ऊसदर देण्यात यावा, असे मत खासदार संदिपान भुमरे यांनी व्यक्त केले.
नवगाव, ता. पैठण येथील गुलमेश्वर नॅचरल शुगर प्रायव्हेट लिमिटेड या गूळ पावडर निर्मिती करणाऱ्या कारखान्याच्या पाचव्या गळीत हंगामाचा शुभारंभ सोमवारी खासदार संदिपान भुमरे यांच्या हस्ते उसाची मळी गव्हाणीत टाकून करण्यात आला. यावेळी कारखान्याचे काटा पूजन ह.भ.प. बाबुराव महाराज गिरी यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमात कारखान्याचे चेअरमन पवन चव्हाण यांनी कारखान्याच्या प्रगतीची माहिती शेतकऱ्यांना दिली. तर कार्यकारी संचालक संजय खरात यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी खासदार संदिपान भुमरे यांनी रेणुकादेवी-शरद सहकारी साखर कारखान्याचा चालू हंगामातील ऊसदर २९०० रुपये जाहीर केला. दुष्काळी परिस्थितीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी योग्य दर देण्यावर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला चेअरमन आमदार विलास बापू भुमरे, बापूराव खरात, सिद्धेश्वर वायकर, हेमंत जहांगीड, आप्पासाहेब निर्मळ, अफसर भाई, किशोर चौधरी, भूषण कावसानकर, मनोज गायके, डांगे यांच्यासह अनेक मान्यवर आणि शेतकरी उपस्थित होते.
No Comment! Be the first one.