लोकार्थ प्रतिनिधी प्रवीण देशपांडे परभणी
वीरशैव लिंगायत समाजाच्या धार्मिक, आध्यात्मिक, सामाजिक व संघटनात्मक कार्याला अधिक व्यापक दिशा देण्याच्या उद्देशाने वीरशैव लिंगायत शिवाचार्य महासभा महाराष्ट्र संस्थेची महत्त्वपूर्ण बैठक बुधवार, दि. ७ ऑक्टोबर रोजी श्री क्षेत्र मन्मथ स्वामी देवस्थान, कपिलधार येथे झाली.
अखिल भारतीय वीरशैव शिवाचार्य संस्थेचे उपाध्यक्ष श्रीकंठ शिवाचार्य महाराज, नागनसूर, सोलापूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस महाराष्ट्रातील विविध भागांतील शिवाचार्य महाराजांची उपस्थिती होती.
बैठकीत वीरशैव लिंगायत शिवाचार्य महासभा महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी तपोरत्न नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज सोनपेठकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
तपोरत्न नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज सोनपेठकर हे वीरशैव लिंगायत समाजातील अध्यात्मनिष्ठ, अभ्यासू, तपस्वी आणि समाजप्रबोधनाची भूमिका प्रभावीपणे पार पाडणारे शिवाचार्य म्हणून परिचित आहेत. वीरशैव लिंगायत धर्मपरंपरेतील मूल्ये, संस्कार, अध्यात्म आणि सामाजिक एकोपा यांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी सातत्याने कार्य केले आहे.
या बैठकीत महासभेच्या नूतन कार्यकारिणीचीही घोषणा करण्यात आली.
कार्याध्यक्ष डॉ. शंभुलिंग शिवाचार्य महाराज उदगीरकर
उपाध्यक्षपदी शिवाचार्य महाराज गिरगावकर,सचिव -डॉ. विरुपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेडकर
कोषाध्यक्ष- महादेव शिवाचार्य वाईकर महाराज,प्रवक्ते – अमृतेश्वर शिवाचार्य महाराज जिंतूरकर यांची तर सदस्यपदी दिगंबर शिवाचार्य महाराज वसमतकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

No Comment! Be the first one.