यावल तालुक्यात धक्कादायक प्रकार !
लोकार्थ प्रतिनिधी राहुल मुळे
जळगाव जिल्ह्यातील दहिगाव येथे ही घटना घडल्याची तक्रार आहे. पीडित व्यक्तीच्या म्हणण्यानुसार, त्यांना विहिरीत सुमारे १५ मिनिटे उलटे लटकवून मारहाण करण्यात आली. या घटनेचा मोबाईल व्हिडिओ तयार करून तो व्हॉट्सॲपवर प्रसारित केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकरणी यावल पोलिसांनी कारवाई करत दोन संशयित आरोपींना अटक केली आहे. तर व्हिडिओ तयार करणारा तिसरा साथीदार फरार असून त्याचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास यावल पोलिसांकडून सुरू आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अजयकुमार वाढवे करत आहेत.
No Comment! Be the first one.