लोकार्थ प्रतिनिधी चंद्रकांत अंबिलवादे
पैठण : आगापूर शिवारात शेतात काम करणाऱ्या महिलेचे तोंड दाबून चाकूचा धाक दाखवत सोन्याची पोत, कानातील फुले व कुडके हिसकावणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. २७ सप्टेंबर रोजी ही घटना घडली होती.
तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे रोहित निल्या पवार (रा. चंदनापुरी, ता. अंबड) व फयाज ऊर्फ सल्या शेरु ऊर्फ संतोष काळे (रा. साकेगाव, ता. पाथर्डी) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून लुटलेले सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून, एका फरार साथीदाराचा शोध सुरू आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक विजयसिंग राजपूत यांच्या पथकाने केली.
No Comment! Be the first one.