लोकार्थ प्रतिनिधी
पुणे : एक लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप असलेल्या पोलिस हवालदाराने एसीबीच्या सापळ्याची चाहूल लागताच चक्क घटनास्थळावरून पोबारा केला. विशेष म्हणजे, सापळा कारवाईत स्वीकारलेली ९५ हजार रुपयांची लाचेची रक्कम घेऊनच तो पसार झाल्याची माहिती आहे.
शिरूर पोलिस ठाण्यातील हवालदार सतीश नाथराव मुंढे याच्याविरुद्ध तक्रारदाराच्या कुटुंबीयांविरोधातील गुन्ह्यात मदत करण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी केल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली होती. तडजोडीनंतर ९५ हजार रुपये देण्याचे ठरले.
त्यानुसार ३० सप्टेंबर रोजी पुणे एसीबीने टाकलेल्या सापळ्यात तक्रारदाराकडून ९५ हजार रुपये स्वीकारताच हवालदार मुंढेला सापळ्याची चाहूल लागली आणि त्याने तेथून धूम ठोकली.
या अनपेक्षित प्रकाराने हवालदिल झालेल्या एसीबीच्या पथकाने त्याचा शोध सुरू केला असून, त्याच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
लाच स्वीकारली ,सापळा लक्षात आला आणि हवालदार पैसे घेऊनच पसार!
No Comment! Be the first one.