विजय देऊळगावकर
छत्रपती संभाजीनगर : सिडको परिसरातील म्हाडा कॉलनीत स्लॅबचे काम करताना दुसऱ्या मजल्यावरून पडल्याने ४० वर्षीय मजुराचा मृत्यू झाला. राजू परमेश्वर धपाटे (रा. उस्मानपुरा) असे मृताचे नाव आहे. सोमवारी (१४ सप्टेंबर) सकाळी ९ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
राजू हे स्लॅब टाकण्याचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. म्हाडा कॉलनीतील एका घराच्या दुसऱ्या मजल्यावर काम करत असताना अचानक त्यांचा तोल गेला आणि ते थेट खाली कोसळले. या अपघातात त्यांच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत झाली. नागरिकांनी त्यांना तत्काळ घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले; मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

मयत राजू परमेश्वर धपाटे
No Comment! Be the first one.