खुलताबाद : पोलीस ठाण्यात बसविण्यात आलेल्या प्रतिष्ठापना झालेल्या श्री गणपती बाप्पाचे शनिवारी भक्तिमय वातावरणात विसर्जन करण्यात आले. यानिमित्ताने पोलीस ठाण्यातून ढोल ताशांच्या गजरात गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकी दरम्यान पोलीस अधिकारी - कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. ढोल ताशांच्या तालावर पोलीस कर्मचाऱ्यांनी गणपती बाप्पा समोर म्हणून नृत्याचा आनंद घेतला. गणपती बाप्पा मोरया मंगलमुर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, अशा जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला. यावेळी पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आज शनिवारी पोलीस ठाण्यातील गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला.
खुलताबाद पोलीस ठाण्यातील गणपती बाप्पाचे ढोल ताशाच्या गजरात शनिवारी विसर्जन
Related Posts
पाडव्याच्या स्नेहसंमेलनातून ढाकेफळने जपली शेतकरी ऐक्याची परंपरा
November 10, 2026
केजच्या लक्ष्मीनगरमध्ये विठ्ठल – रुक्मिणी मूर्तीची स्थापना
November 10, 2026
नाथसागरच्या पाण्याने रब्बी हंगामाला मिळणार संजीवनी.
November 10, 2026
No Comment! Be the first one.