लबाडांचे अवतन म्हणत राज्य सरकारचा निषेध
लोकार्थ प्रतिनिधी प्रवीण देशपांडे
परभणी – संपूर्ण मराठवाड्यात उद्भवलेल्या अभूतपूर्व दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दुष्काळासह तकलादू सोयी सुविधासंबंधी काढलेल्या अध्यादेशाच्या प्रतीची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेते मंडळीसह कार्यकर्त्यांनी सोमवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होळी केली. राज्य सरकारचे निर्णय म्हणजे लबाडांचे अवतन होय असा टोलाही लगावला.
येथील तहसील कार्यालयासमोर सोमवारी सकाळी शिवसेनेचे नेते डॉक्टर विवेक नावंदर, जिल्हाप्रमुख विष्णू मुरकुटे, जिल्हाप्रमुख रवींद्र धर्मे, शिवलिंग बोधने, सदाशिवराव देशमुख,अरविंद देशमुख, नवनीत पाचपोर, अनिल डहाळे, संभानाथ काळे, बाळासाहेब तळेकर, यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राज्य सरकारच्या अध्यादेशाची प्रचंड घोषणाबाजी करीत होळी केली व निषेध नोंदवला.
No Comment! Be the first one.