लोकार्थ प्रतिनिधी
भारतीय धावपटू विथ्या रामराजनं आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६मध्ये महिलांच्या ४०० मीटर हर्डल्सच्या अंतिम फेरीत ५४.७५ सेकंदांची वेळ नोंदवून कांस्यपदक पटकावलं. तिनं ४२ वर्षं जुना पी.टी. उषा यांचा राष्ट्रीय विक्रम मोडला आहे. या कांस्यपदकासह विथ्या रामराजने यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील दुसरं पदक जिंकलं आहे.
पी. टी. उषा यांनी ५५.४२ सेकंदांची वेळ नोंदवत राष्ट्रीय विक्रम केला होता. भारतीय अॅथलेटिक्समधील सर्वाधिक काळ टिकलेल्या विक्रमांपैकी हा एक होता. विथ्या काही काळापासून या विक्रमाच्या जवळ पोहोचत होती. पण आशियाई स्पर्धेत तिने हा विक्रम मोडीत काढला. भारतीय अॅथलेटिक्सच्या इतिहासातील एक दीर्घकाळ टिकलेला विक्रम मोडल्याची जाणीव होताच २८ वर्षीय कोयंबतूरच्या विथ्याने मैदानात नाचून जल्लोष केला.
No Comment! Be the first one.