ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य
लोकार्थ प्रतिनिधी प्रवीण देशपांडे
ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त महानगरपालिकेच्या वतीने महापालिकेच्या बेघर निवारा केंद्र साखला प्लॉट येथे गुरुवार (दिनांक 1 रोजी ) दुपारी चार वाजता ज्येष्ठ नागरिकांचा गौरव करून त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
मनपा तर्फे साखला प्लॉट भागामध्ये बेघर निवारा केंद्र चालवण्यात येते येथे गुरुवार दिनांक 1 ऑक्टोबरला आयुक्त नितीन नार्वेकर यांच्या सूचनेनुसार ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने त्यांची आरोग्य तपासणी करुन गरजेनुसार त्यांच्यावर प्राथमिक उपचार देखील करण्यात आले. यावेळी त्यांचा गौरव करण्यात आला. उपायुक्त तुकाराम कदम, उपायुक्त प्रज्ञावंत कांबळे, महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना सावंत यांच्या अधिपत्याखाली शिबिर घेण्यात आले. शिबिराचे उद्घाटन सहाय्यक आयुक्त गजानन जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी समाज कल्याण अधिकारी राजकुमार जाधव, डॉ.स्वाती साठे, दत्तात्रय हाके, सय्यद युनुस, सावली सेवाभावी संस्थेच्या गायकवाड यांची उपस्थिती होती.

No Comment! Be the first one.