राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीचे औचित्य
लोकार्थ प्रतिनिधी प्रवीण देशपांडे परभणी
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवार (दि.02) परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीने ‘स्वच्छ भारत अभियान 2.0’ अंतर्गत ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान राबविण्यात आले.
या अभियानांतर्गत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते स्टेट बँक ऑफ इंडिया मुख्य शाखा या परिसरात स्वच्छता मोहीम घेण्यात आली. महानगरपालिकेचे आयुक्त नितीन नार्वेकर यांच्या नेतृत्वाखाली मनपाचे अधिकारी, कर्मचारी तसेच शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत श्रमदान केले.यावेळी आयुक्त नार्वेकर यांनी हिरवा झेंडा दाखवुन उदघाटन केले.
यावेळी सहभागी नागरिक व मनपा कर्मचाऱ्यांनी परिसराची स्वच्छता करून ‘स्वच्छ परभणी, सुंदर परभणी’ या संकल्पनेला बळ देण्याचा प्रयत्न केला. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये, स्वच्छता राखावी तसेच स्वच्छ व सुंदर शहर निर्मितीसाठी महानगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे, हा संदेश देण्यात आला.
यावेळी नगरसेवक रितेश जैन, मुख्य स्वच्छता अधिकारी करण गायकवाड, शहर समन्वयक अधिकारी तुराब खान, मुख्य स्वच्छता निरीक्षक श्रीकांत कुरा,नगरसचिव विकास रत्नपारखी,माहीती व जनसंपर्क विभाग प्रमुख राजकुमार जाधव, भांडार विभाग प्रमुख रामेश्वर कुलकर्णी, स्वच्छता निरीक्षक न्यायरतन घुगे, अब्दुल शहादाब, प्रल्हाद देशमाने, सौरभ जोगदंड, राजू जोडपे, उमेश जाधव, सुधाकर किंगरे, माजी नगरसेविका मंगल मुदगलकर आदींसह कर्मचारी, मुकादम व सफाई कामगार उपस्थित होते.
No Comment! Be the first one.