लोकार्थ प्रतिनिधी विजय देऊळगावकर छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगर : तब्बल १९ वर्षांनंतर भारताला २१ व्या आंतरराष्ट्रीय त्रिपिटक पठण सोहळ्याचे यजमानपद मिळाले आहे. बिहारमधील बुद्धगया येथे २ ते १२ डिसेंबरदरम्यान होणाऱ्या या सोहळ्यात २७ देशांतील सुमारे ५ हजार बौद्ध भिक्खू व उपासक सहभागी होणार आहेत.
लाईट ऑफ बुद्ध धम्मा फाउंडेशन इंटरनॅशनलसह १७ बौद्ध संस्थांच्या पुढाकाराने हा सोहळा होत असून, त्रिपिटक पठण, धम्मदेशना, ध्यान व सांस्कृतिक आदान-प्रदानाचे कार्यक्रम होणार आहेत. २ डिसेंबरला आंतरराष्ट्रीय धम्म रॅलीने सोहळ्याला सुरुवात होईल. १३ ते १५ डिसेंबरदरम्यान जेठीयन व्हॅली व राजगीर येथे आंतरराष्ट्रीय बौद्ध शांतता पदयात्रा होणार असल्याची माहिती भंते विनय रक्खीता महाथेरो यांनी पत्रकार परिषदेत दिली.

No Comment! Be the first one.