लोकार्थ प्रतिनिधी
मुलींच्या वसतिगृहातील बाथरूममध्ये 10 फूट लांबीचा अजगर!
मध्य प्रदेशातल्या सागर येथील मुलींच्या वसतिगृहात बाथरूममध्ये तब्बल 10 फूट लांबीचा अजगर आढळल्याने विद्यार्थिनींमध्ये घबराट पसरली. अजगर दिसताच वसतिगृह प्रशासनानं तातडीने सर्पमित्राला बोलावलं. सर्पमित्र अकील बाबा त्यांच्या मदतीला धावून आले.
काही वेळ संघर्ष झाल्यानंतर त्यांनी जवळपास 10 फूट लांबीच्या अजगराला पकडले.
अकील बाबा यांनी सांगितलं की, टिली परिसर डोंगराळ भागाच्या जवळ असल्याने इथे साप आढळत असतात. निवाऱ्याच्या शोधात साप आणि अजगर मानवी वस्त्यांमध्ये सहज प्रवेश करतात.

No Comment! Be the first one.