लोकार्थ प्रतिनिधी ज्ञानेश्वर पाबळे जाफराबाद
जालना : जाफराबाद तालुक्यातील ब्रह्मपुरी येथील नदीपात्रात अवैध वाळू उत्खननासाठी वापरण्यात येणाऱ्या लहान-मोठ्या एकूण पाच बोटी महसूल विभागाने ब्लास्ट करून नष्ट केल्या. या कारवाईमुळे अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या वाळूमाफियांना मोठा आर्थिक फटका बसला असून, अंदाजे 90 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. जाफराबाद तालुक्यात अजूनही बऱ्याच ठिकाणी अवैध वाळू उपसा होत आहे. महसूल व पोलिस प्रशासनासमोर वाळू माफिया यांचे मोठे आव्हान उभे झाले होते.
No Comment! Be the first one.