कव्वाली कार्यक्रमात बसण्याच्या जागेवरून वादाचे हाणामारीत रूपांतर; धारदार शस्त्रांनी वार, शहरात तणावाचे वातावरण
लोकार्थ प्रतिनिधी ज्ञानेश्वर पाबले जाफराबाद
देऊळगाव राजा :सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे देऊळगाव राजा येथील नगर सेवक अनवर शेख व आरिफ शेख या दोन्ही नगरसेवकांचा मृत्यू झाला आहे. देऊळगाव राजा इथं एका कव्वालीच्या कार्यक्रमामध्ये बसण्याच्या जागेवरून दोन्ही गटामध्ये वाद झाला. या घटनेत ७ जण जखमी झाले आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, देऊळगाव राजा शहरात रात्री एका कव्वालीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमामध्ये शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी गटाच्या नेत्यांमध्ये वाद झाला. हा वाद बसण्याच्या जागेवरून झाला होता. या दोन गटामध्ये जोरदार बाचाबाची झाली, बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीमध्ये झाले. यावेळी दोन्ही गटाने एकमेकांवर धारदार शस्त्राने वार केल्याची माहिती समोर आली आहे. दोन गटांत झालेल्या तुंबळ हाणामारीत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक अनवर शेख तर अजित पवार गटाचे कार्यकर्ता आरिफ शेख यांचा समावेश आहे. यामुळे परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहे. या मारहाणी मध्ये दोन्ही गटाचे कार्यकर्ते जखमी झाले आहे. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केलं आहे.


No Comment! Be the first one.