लोकार्थ प्रतिनिधी
मायक्रोसॉफ्ट या जगप्रसिद्ध कंपनीच्या एआय विभागाचा उपाध्यक्ष, २३ वर्षांच्या प्रदीर्घ नोकरीनंतर फक्त आजारी आई-वडिलांसोबत राहण्यासाठी भारतात परतला आहे. केशवन् षण्मुगम असं त्यांचं नाव असून, ते एक्सेल कॉपिलॉट प्रोजेक्टवर काम करत होते. ‘लिंक्डइन’ माध्यमावर त्यांनी याविषयी पोस्ट केली आहे. त्यांच्या या घोषणेवरून आयटी क्षेत्रात चर्चा सुरू झाली आहे. जागतिक पातळीवर एआयच्या क्षेत्रात क्रांती घडत असताना त्यांनी काही कोटी रुपये पगाराची नोकरी का सोडली, असा प्रश्नही काही नेटकरी विचारत आहेत.

No Comment! Be the first one.