लोहा-कंधार तालुक्यातील २३०० महिलांना शिधा किटचे वाटप
लोकार्थ प्रतिनिधी बालाजी वैजळे
कंधार – मराठवाड्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी कुटुंबांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत गरीब, कष्टकरी आणि दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांची दिवाळी गोड व्हावी, या सामाजिक भावनेतून शिवसेनेच्या वतीने लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघातील महिलांना शिधा किटचे वाटप करण्यात आले. दि.
७ रोजी बाळांतवाडी, कंधार येथे आयोजित या उपक्रमांतर्गत तब्बल २ हजार ३०० महिलांना शिधा किटचे वितरण करण्यात आले.
शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी शिवसेना शेतकरी नेते तथा माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे आणि लोहा-कंधार विधानसभा प्रमुख दिलीप धोंडगे यांच्या हस्ते लाभार्थी महिलांना शिधा किटचे वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना शंकरअण्णा धोंडगे म्हणाले की, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडे गरजूंच्या मदतीसाठी पुढाकार घेण्याची दानत आहे. गरीब व कष्टकरी शेतकरी कुटुंबांची दिवाळी आनंदात जावी, यासाठी त्यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे. शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या अडचणीच्या काळात मदतीचा हात देणाऱ्या एकनाथराव शिंदे यांच्या पाठीशी जनतेने खंबीरपणे उभे राहावे आणि त्यांना आशीर्वाद द्यावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
या उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या अनेक कुटुंबांना दिवाळीच्या सणासाठी दिलासा मिळाला.
यावेळी आयोजक तथा विधानसभा प्रमुख दिलीपदादा धोंडगे, कंधार तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर तिडके, शिवराज पाटील धोंडगे,लोहा तालुकाध्यक्ष गजानन कराळे, भास्कर पाटील कौटगावकर, सुभाषराव मोरे,फुलाजी ताटे, अवधूत पेटकर,पिंटू बाबर, जीवन पाटील वडजे,कंधार शहराध्यक्ष रहीम खान, अब्बू भाई, महिला आघाडी अध्यक्ष पार्वतीबाई केंद्रे, पुरोहित मॅडम, उज्वलाताई यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
No Comment! Be the first one.