चार लाखांच्या पार गेलेले चांदीचे दर आता दोन लाखांच्या आत; रजत नगरीत खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी
लोकार्थ प्रतिनिधी अक्षय थिगळे
धनत्रयोदशीला (धनतेरस) चांदी खरेदी करणे अतिशय शुभ मानलेजाते.धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. सणासुदीच्या काळात बाजारात सोन्या-चांदीची मागणी वाढली असून, दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरात मागील वर्षीच्या तुलनेत घट झाली आहे. आज चांदी एक लाख 87 हजार रुपये तर सोने एक लाख 43 हजारच्या जवळ पोहोचला आहे. झाली आहे. विशेष म्हणजे, सोन्याच्या दरात सलग पाचव्या दिवशी चढ उतार दिसून आला आहे गेल्या पाच दिवसांत २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमच्या किमतीत तब्बल ७ हजार १५० रुपयांची वाढ झाली आहे.
याआधी ३० आणि ३१ ऑक्टोबर रोजी सलग दोन दिवस सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली होती. या दोन दिवसांत २४ कॅरेट सोन्याचे १० ग्रॅमचे दर ५ हजार ७० रुपयांनी, त्यानंतर काही दिवस दर स्थिर राहिले. मात्र, आता पुन्हा सोन्याच्या किमती वाढू लागल्या आहेत.
No Comment! Be the first one.