लोकार्थ मिडिया
बांगलादेशच्या माजी हंगामी सरकारचे प्रमुख आणि नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांना न्यूयॉर्कमधील जॉन एफ. केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अनिवासी बांगलादेशी नागरिकांच्या संतापाचा सामना करावा लागला. प्रवाशांच्या एका गटाने त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. संतप्त नागरिकांनी युनूस यांचा थेट “दहशतवादी” असा उल्लेख करत, त्यांच्यावर बांगलादेशमध्ये शेकडो सामान्य नागरिकांच्या हत्येचा गंभीर आरोप केला.
परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून विमानतळावरील सुरक्षा रक्षकांनी तत्काळ हस्तक्षेप केला आणि मोहम्मद युनूस यांना गर्दीतून सुरक्षित बाहेर काढले. मुख्य सल्लागार पद सोडल्यानंतरच्या युनूस यांच्या पहिल्याच परदेश दौऱ्यात ही घटना घडली आहे.
No Comment! Be the first one.