सरकार शेतकऱ्यांसोबत आहे. धीर धरा.
लातूर
शासनाने दुष्काळाची परिस्थिती अतिशय गांभीर्याने घेतली आहे. मराठवाड्यात, विशेषतः लातूरमध्ये, १९७२ नंतर भीषण दुष्काळी परिस्थिीमुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी सरकार सरसकट मदत करणार आहोत. येत्या दोन दिवसांत दुष्काळ निवारणासाठी शासन जीआर काढणार असून, रबी पिकांनाही मदत दिली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी केली. लातूर, धाराशीव जिल्ह्यातील पीक-पाणी परिस्थितीच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांचे आज औसा तालुक्यातील खरोसा येथे दुष्काळग्रस्त
भागातील शेतक-यांशी संवाद साधत असताना शेतक-यांना तातडीने मदतीचे आश्वासन दिले.
शेतकऱ्याची सरसकट मदतीची मुख्यमंत्री यांच्याकडे आर्त हाक…
उपस्थित शेतक-यांनी शेतात करपलेल्या सोयाबीनच्या पेंड्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दाखवल्या या सोयाबीनच्या करपलेल्या पेंढ्या मध्ये सोयाबीनची बी दिसून येत नव्हते याबाबत शेतक-यांनी देवेंद्र फडणवीस यांना पंचनामे न करता शेतक-यांना तातडीने सरसकट मदत करावी अशी मागणी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लातूर आज दुष्काळी पाहणी करण्यासाठी औसा शेतक-यांच्या बांधावर जाऊन मुख्यमंत्री पाहणी करत आहेत. शेतक-यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी संवाद साधताना सांगितले की, येत्या दोन दिवसात दुष्काळाचा जीआर काढणार असल्याची घोषणा केली. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आम्ही जलसंधारणाची कामे हाती घेणार आहोत. रोजगार निर्मितीचीही कामे हाती घेणार आहोत. या संकटात तुम्ही एकटे नाही.
चारा, पाण्याचे सुक्ष्म नियोजन करणार
दुष्काळी परिस्थितीत आवश्यक असणारे पाणी, जनावरांचा चारा आदी बाबींचे सूक्ष्मा नियोजन करण्यात आले असल्याचेही मुख्यमंत्री यांनी सांगितले. औसा व निलंगा या दोन्ही तालुक्यांमध्ये आमची पाहणी झाली आहे. लातूर जिल्ह्यात पडलाय केवळ ५० टक्के पाऊस पडलेला आहे त्यामुळे नदी नाले विहिरी पूर्ण पडल्यात आणि विशेषतः आम्ही बघितलं की सोयाबीनचा पीक पूर्णपणे त्या ठिकाणी नष्ट झालेले आहे. जनावरांकरता चा-याची व्यवस्था थेट मदत आणि त्यासोबत आमच्या शेतक-यांना अन्नधान्याची मदत आणि इतर सगळ्याप्रकारची मदत शासन करेल अशी ग्वाही त्यांनी दिली.
शासन तुमच्यासोबत
कर्जमाफीचं काम अजूनही सुरू आहे. जोपर्यंत कर्जमाफीचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही. कर्जमाफीचे पैसे देऊ. दुष्काळाचे पैसे लवकरात लवकर खात्यात टाकू. १९७२ नंतर इतका मोठा दुष्काळ पहिल्यांदा पाहायला मिळत आहे. मागच्या काळात ६४ टक्के पाऊस झाला होता. पण चिंता करू नका. सरकार तुमच्यासोबत आहे. जे चांगलं आहे ते करू. तुम्हाल मदत करणयात मागे पुढे पाहणार नाही. धीर ठेवा, असं आवाहनही त्यांनी केलं.
सर्वाधिक परिणाम लातूरवर
मराठवाड्यातील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. पण सर्वाधिक परिणाम लातूरवर झाला आहे. त्यातून आपण मार्ग काढणार आहोत. चारा आणि पाण्याचं नियोजन केलं आहे. कोल्हापूर आणि सांगलीतून पाणी आणलं जाणार आहे. जी काही मदत लागेल ती आम्ही करणार आहोत. तुम्हाला आर्थिक मदत दिली जाणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.
पंचनामे कायदा म्हणून करावे लागतात..
आपल्या अडचणी वाढणार आहेत हे आम्हालाही समजत आहे त्यामुळे आम्ही तात्काळ ही मदत करतो आणि आता पंचनामे वगैरे आम्ही करतात पण पंचनामे कायदा म्हणून करावे लागतात बाकी तुमच्या नुकसान सरसकट झालेला आम्हाला दिसत आहे मग तशाच पद्धतीने सरसकट मदतच आम्ही करणार आहोत.
आपल्या सोबत सरकार संवेदनशील : आमदार अभिमन्यू पवार
औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी खरोसा पाच खेडी योजनेचा या ठिकाणी उल्लेख करत म्हणाले, शासनाच्या वतीने बिल भरून रखडलेल्या योजना सुरू करू आणि त्या पाणी जे आहे ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू मी पुन्हा एकदा आपल्याला आश्वस्त करतो सरकार आपल्या सोबत या संवेदनशील आहे जे चांगल्या चांगल्या करता येईल ते आम्ही करू कुठेही मागे पुढे पाहणार नाही.
औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी खरोसा पाच खेडी योजनेचा या ठिकाणी उल्लेख करत म्हणाले, शासनाच्या वतीने बिल भरून रखडलेल्या योजना सुरू करू
औसा तालुक्यातील खरोसा भागात करपलेल्या शेतीची पाहणी केली. यावेळी उपस्थित असलेल्या शेतक-यांची देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधला यावेळी त्यांच्यासोबत लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर,औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार,आमदार संभाजी पाटील निलंगेकर, माजी मंत्री आमदार संजय बनसोडे, आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील, माजी आमदार दिनकर माने यांच्यासह सर्व विभागाचे प्रशासकीय अधिकारी, भाजपा पदाधिकारी व या परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते
No Comment! Be the first one.