मंगळवारी सकाळपासून कारखान्याची चाके पुन्हा फिरू लागली – शेतकऱ्यात आनंद
लोकार्थ प्रतिनिधी चंद्रकांत आंबिलवादे
सोमवारी ऊस दरवाढीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कारखान्याच्या उसाच्या गव्हाणीत बसून आंदोलन सुरू केले होते. या पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कारखाना प्रशासनाने गाळप बंद ठेवल्याने कारखाना परिसरात आणि शेतात तोडून ठेवलेला ऊस वाळू लागला होता.
रात्री 9 वाजता हे आंदोलन संपल्याने मंगळवारी सकाळपासून कारखान्याचे गाळप पूर्ववत सुरू झाल्याची माहिती व्हॉईस चेअरमन नंदकुमार पठाडे, कार्यकारी संचालक नामदेव बावडकर, शुगर मिलचे दत्तात्रय रेवडकर, जिल्हा परिषद सदस्य नितीन तांबे, संचालक अफसर भाई शेख यांनी दिली आहे.
दरम्यान कारखाना प्रशासनाने स्वाभिमानीच्या आंदोलनाची दखल घेत उसाचा उतारा चांगला मिळाल्यास शेतकऱ्याला जास्तीत जास्त भाव देण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिल्याने हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आल्याची माहिती स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष ज्ञानदेव मुळे आणि पवन शिसोदे यांनी दिली.
णुकादेवी-शरद कारखाना नेहमी शेतकऱ्यांच्या बाजूने असून हा गाळप हंगाम यशस्वी करण्यासाठी संचालक मंडळ, अधिकारी आणि कामगार प्रयत्नशील आहेत. त्यामुळे कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता शेतकऱ्यांनी आपला ऊस कारखान्याला द्यावा असे आवाहन चेअरमन आमदार विलास बापू भुमरे यांनी केले आहे.

No Comment! Be the first one.