घरातून तलवार जप्त
लोकार्थ प्रतिनिधी विजय देऊळगावकर
छत्रपती संभाजीनगर : गस्तीवरील पोलिस व्हॅनमधून रील करून सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या प्रफुल्ल उर्फ ‘लादेन’च्या शहर गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या. संघर्षनगरातून त्याला ताब्यात घेतल्यानंतर मुकुंदवाडी पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेत तलवार जप्त केली. त्याचे साथीदार राजन, अभय आणि केतन यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.
गणेशोत्सवादरम्यान विठ्ठलनगर चौकात तयार केलेली १९ सेकंदांची रील व्हायरल झाली होती. यात प्रफुल्ल मुकुंदवाडी पोलिसांच्या शासकीय व्हॅनमधून उतरून स्टाईलमध्ये पोज देताना दिसत होता. रीलची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी शहर गुन्हे शाखेला कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार काही तासांतच प्रफुल्लला ताब्यात घेण्यात आले.
यानंतर त्याच्या घराची झडती घेतली असता तलवार मिळून आली. ती जप्त करण्यात आली आहे. दरम्यान, गुन्हेगाराला पोलिसांची व्हॅन उपलब्ध करून देणाऱ्या संबंधित पोलिसांवरही कारवाईची मागणी होत आहे.
No Comment! Be the first one.