दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर नवरात्र उत्सव साधेपणाने साजरा करा
महासंघाच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीस 1 लाखाची मदत
लोकार्थ प्रतिनिधी विजय देऊळगावकर छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगर सार्वजनिक नवरात्र महासंघाच्या २०२६च्या अध्यक्षपदी प्रा. सौ. दयाताई कैलास गायकवाड यांची सर्वसंमतीने निवड करण्यात आली. यावेळी महासंघाचे मार्गदर्शक रेणूकदास (राजू) वैद्य, कैलास गायकवाड, प्रल्हादजी निमगावकर, संस्थापक पदाधिकारी सचिनभाऊ देशमुख, श्रीराम पवार, रवींद्र काळे पाटील, पारस जैन, नारायण पारटकर आदी उपस्थित होते.
राज्यातील गंभीर दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यंदाचा नवरात्र उत्सव साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन महासंघाने केले आहे. जवाहरनगर पोलिस स्टेशन सिग्नलसमोरील जागेत महासंघाच्या वतीने देवीची घटस्थापना करण्यात येणार असून, दुष्काळ निवारणासाठी महाआरतीद्वारे देवीला साकडे घालण्यात येणार आहे.
सामाजिक दायित्व म्हणून महासंघाच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक लाख रुपयांचा धनादेश देण्यात येणार आहे. तसेच शहर-जिल्ह्यातील सर्व नवरात्रोत्सव मंडळांनी दुष्काळग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ही माहिती महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी देविदास पवार, रंगनाथ मोरे, साईनाथ कुरचुंडे, ॲड. सिद्धार्थ वारे, बापूसाहेब देसले आदी उपस्थित होते.
No Comment! Be the first one.