भीम प्रहार संघटनेचा पुढाकार
लोकार्थ प्रतिनिधी प्रवीण देशपांडे
गायरानधारक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर भीम प्रहार संघटनेच्या वतीने प्रा. डॉ. प्रवीण कनकुटे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी दि.५ रोजी येथील जिल्हाधिकारी कार्यालयसमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले .
गायरानधारक शेतकऱ्यांना सातबारा देण्यात यावा, त्यांना फार्मर आयडी देण्यात यावा,सात बारा धारकांच्या सातबारा वरील पोट खराब हा शब्द कमी करण्यात यावा, तसेच गायरान जमिनीवर कोणतेही शासकीय प्रकल्प उभारू नये ,आणि सातबारा धारक गायरानधारकांची पोट हिस्सा मोजणी करावी, या प्रमुख मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले आंदोलनानंतर जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांना भेटून निवेदन देण्यात आले. त्यामध्ये पोट खराब आणि फार्मर आयडी हे गायरानधारकाचे प्रश्न लवकर निकाली काढण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी शिष्टमंडळात दिले.
आंदोलनामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हाध्यक्ष कॉ. कीर्ती कुमार बुरांडे, मानवी हक्क अभियानाचे जिल्हाध्यक्ष पप्पू राज शेळके, समाजवादी जन परिषदेचे नेते आप्पाराव मोरताटे, निर्मला भालके, प्रसाद गोरे, शेख चांद, बाबासाहेब धबाले, सुधाकर वाघमारे, निलेश कांबळे यांनी देखील उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून गायरान धारक शेतकरी या धरणे आंदोलनात मोठ्या प्रमाणात उपस्थित राहिले. हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी दीपक कनकुटे, राहुल कनकुटे, निलेश कांबळे, सुधाकर वाघमारे, विकास कदम, यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
No Comment! Be the first one.