लोकार्थ प्रतिनधी विजय देऊळगावकर
छत्रपती संभाजीनगर : मध्यरात्री मोटरसायकल बंद पडल्याचा फायदा घेत, अज्ञात दुचाकीस्वाराने ‘तुझ्याकडे ड्रग्ज आहे, तपासणी करायची आहे,’ असे म्हणत एका व्यक्तीला चाकूचा धाक दाखवून २७ हजार ५०० रुपयांचा मोबाईल हिसकावून नेला. ही घटना ४ ऑक्टोबर रोजी रात्री १२.२० वाजता आकाशवाणी चौक सिग्नलजवळ घडली.
केतन शिंदे यांची मोटरसायकल रामा ग्लास अॅन्ड अॅल्युमिनियम दुकानासमोर बंद पडली होती. त्यावेळी लाल रंगाच्या हिरो एचएफ डिलक्सवरून आलेल्या अज्ञात व्यक्तीने त्यांच्याकडे ड्रग्ज असल्याचा संशय व्यक्त करून तपासणीच्या बहाण्याने खिसे व बॅग तपासली. त्यानंतर चाकू दाखवत ओप्पो कंपनीचा मोबाईल बळजबरीने हिसकावून तो दुचाकीवरून पसार झाला.
याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
No Comment! Be the first one.