लोकार्थ प्रतिनिधी विजय देऊळगावकर
छत्रपती संभाजीनगर : ओला कॅब चालकाने प्रवाशाचा मोबाईल हिसकावून त्यातील फोन-पेद्वारे तब्बल ९० हजार रुपये परस्पर दुसऱ्याच्या खात्यावर ट्रान्सफर केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात ओला चालक दीपक सायमन शेळके आणि कुणाल दीपक शेळके यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
विष्णुनगर येथील देवीच्या मंदिराजवळ १ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.३८ ते २ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजेदरम्यान हा प्रकार घडला. फिर्यादी द्वारकादास बाहेती (६६) यांचा सॅमसंग गॅलेक्सी ए१५ मोबाईल ओला चालक दीपक शेळके याने बळजबरीने हिसकावून घेतल्याचा आरोप आहे. त्यानंतर मोबाईलमधील फोन-पेद्वारे तीन व्यवहार करून ९० हजार रुपये कुणाल शेळके यांच्या खात्यावर वळविण्यात आले.
याप्रकरणी जवाहरनगर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
No Comment! Be the first one.