लोकार्थ प्रतिनिधी
दुष्काळाची तीव्रता वाढत असताना हक्काच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचा आक्रोश आता रस्त्यावर उतरला आहे.
वैजापूर येथील नांदूर मधमेश्वर कार्यालयावर शेतकऱ्यांकडून आक्रोश मोर्चा काढण्यात येत आहे. नांदूर मधमेश्वर प्रकल्पाच्या पाण्यावर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर आणि गंगापूर, तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील १०६ गावांच्या पिण्याच्या आणि सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न अवलंबून आहे.
दुष्काळामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून, हक्काचे पाणी तातडीने उपलब्ध करून द्यावे, अशी शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे.
याच मागणीसाठी मोठ्या संख्येने शेतकरी आक्रोश मोर्चात सहभागी झाले असून, प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन पाण्याचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
दुष्काळाच्या झळा वाढत असताना आता शेतकऱ्यांचा पाण्यासाठी एल्गार पाहायला मिळत आहे.
No Comment! Be the first one.