लोकार्थ प्रतिनिधी विजय देऊळगावकर छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगर : हर्सूल तलावात मंगळवारी सकाळी अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच हर्सूल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.
मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत स्पष्टता नाही. हा अपघात आहे की घातपात, याचा तपास हर्सूल पोलीस करीत आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.

No Comment! Be the first one.